मांजरम ग्रा.प.महाविकास आघाडी ची सत्ता तर भाजप समर्थकांचा पराभव
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या मांजरम ग्रामपंचायत सरपंचपदी माजी आ.वसंत चव्हाण व माजी खा.खतगावकर समर्थक रूक्मीणबाई रावसाहेब पा.शिंदे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कट्टर समर्थक उपसरपंचपदी बालाजीराव विठ्ठलराव मालीपाटील यांची निवड झाली.सरपंच व उपसरपंच पदाची निवड ही गोपनीय मतदान पध्दतीने झाल्याने अटी तटी ची झाली. आठ विरुद्ध सात असा सामना रंगला.
ग्रामपंचायत कार्यालयात ९ ऑक्टोबर रोजी सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया दुपारी दोन वाजता सुरू झाली. सरपंच पदासाठी दोन अर्ज आले यात रूक्मीणबाई रावसाहेब पा.शिंदे , विरोधी गटाकडून वर्षा संजय जाधव तर उपसरपंच पदासाठी बालाजी विठ्ठलराव मालीपाटील तसेच शिला विठ्ठल शेट्टेवाड यांचे अर्ज आले होते.त्यानंतर गोपनीय पद्धतीने मतदान झाले.यात सरपंच पदाचे दावेदार रूक्मीणबाई रावसाहेब शिंदे यांना ८ तर प्रतिस्पर्धी दावेदार वर्षा संजय जाधव यांना ७ मते मिळाली.उपसरपंचपदासाठी बालाजीराव विठ्ठलराव मालीपाटील यांना ८ तर प्रतिस्पर्धी दावेदार शिला विठ्ठल शेट्टेवाड यांना ७ मते मिळाली.निवड प्रक्रियेत सर्व १५ ग्रा.पं.सदस्यांनी सहभाग घेतला होता.
ग्रा.प.सभागृहात विद्यमान सरपंच सौ. रुक्मिनबाई रावसाहेब शिंदे,
विद्यमान उपसरपंच बालाजी विठ्ठलराव मालीपाटील,
माजी सरपंच सौ. शोभाबाई निळकंठराव मांजरमकर,माजी उपसरपंच सौ. मथुराबाई दिगांबर शिंदे,सौ. सोनाली राजेश शिंदे, पद्माकर बळीराम पांचाळ, सौ. वर्षा संजय जाधव,सौ. रेखा राजु विभुते, विद्यमान सरपंच सौ. रुक्मिनबाई रावसाहेब शिंदे,सौ. अंकिता उमेश केते,कु. सुप्रिया भिमराव नव्हारे,श्रीमती शेषाबाई शंकर फुगारे, विजयकुमार माधव वाघमारे,सौ. शिला विठ्ठल शेटेवाड, खाकु व्यंकटी उलगुलवाड,हरिबाई केशव रेजितवाड,या 15 सदस्यांची उपस्थिती होती.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायगाव पं.स.चे विस्तार अधिकारी गिरजाजी कानोडे यांनी काम पाहिले.यावेळी ग्रामविकास अधिकारी यादव सुर्यवंशी, तलाठी मुधळे यांची उपस्थिती होती.निवड झालेल्या सरपंच, उपसरपंच यांचे मनोज पा.शिंदे, शिवराज पा.शिंदे,बाळासाहेब पांडे, श्रीकांत मालीपाटील, संभाजी पाटील आदींनी स्वागत केले.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरिक्षक जयप्रकाश गुट्टे,सपोउनि.शिवकुमार बाचावार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा