नांदेड जिल्ह्यात १६ तालुक्यात 'येलो मोझ्याकचा' चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
वरील विषयाच्या अनुषंगाने जुन २०२३ मध्ये उशिरा आलेला पाऊस, त्यामुळे खोळंबलेल्या पेरण्या, ऑगस्ट २०२३ मध्ये पडलेला पावसाचा मोठा खंड यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान आणि आता नुकसानीनंतर उरलं सुरलं पीक हाती येईल अशी अपेक्षा बाळगणाऱ्या शेतकऱ्यानं समोर 'येलो मोझ्याक' नावाचं एक नवीन संकट उभं राहिलेलं आहे.
नांदेड जिल्ह्यात १६ तालुक्यात 'येलो मोझ्याकचा' चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामध्ये नायगाव तालुक्यात देखील आहे.पिकांची खोडंकुज, मुळकूज अशा बुरशीजन्य रोग सोयाबीनचं पूर्णपणे नुकसान करत आहे. सोयाबीन पूर्णपणे पिवळी पडत आहे आणि यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिकविमा मिळवण्यासाठी क्लेम देखील केले जात आहे. पीकविमा योजनेच्या अंतर्गत Pest attack अंतर्गत ही बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे. परंतू, शेतकऱ्यांच्या माध्यमातून वैयक्तिक क्लेम/ दावा केल्यानंतर त्याला पीकविमा कंपनीकडून दाद दिली जात नाही. अशे क्लेम त्याठिकाणी पात्र केले जात नाही आणि याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आता विमा मिळणार का? शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार का? अशा प्रकारचे एक ना एक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेले आहेत. तसेच आता शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला सोयाबीन पीक हा 'येल्लो मोझ्याक' रोगामुळे हातातुन निघून गेला आहे. तसेच एक ते दिड महिण्यानंतर दिपावली सण येत आहे त्यामुळे शेतकरी हा आर्थिक व कौटूंबिक संकटात सापडलेला आहे,
त्यात महाराष्ट्र शासनाने दि. ०३/१०/२०२३ रोजी काढलेल्या जी.आर मध्ये शासनाने हेक्टरी मर्यादा ही २ हेक्टर ठेवली आहे तर अनुदानाची रक्कम ८५००/- ठेवली यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने हेक्टरी मर्यादा ही ३ हेक्टर ठेवली होती तर अनुदानाची रक्कम १३६००/- ठेवली होती. शेतकऱ्यांचा एकरी खर्च
१) नागंरणी १००० २) वखरणी ५०० ३) पेंरणी १००० ४) सोयाबीन बॅग २५०० ५) खताचं पोतं १५०० ६) तननाशक फवारणी १००० ७) कोंळपणी १००० ८) निंदन १००० ९) तननाशक फवारणी १००० १०) किटकनाशक फवारणी ३ वेळा ३००० १०) सोयाबीन कापणी ३००० ११) सोयाबीन काढणे १००० अशी जवळपास ढोबळ मानाने एकरी १६५००/- खर्च करुन सुध्दा शासनाने त्यांत हि तुटपुंजी मदत एकरी ३४००/- रु अनुदानाची रक्कम जाहिर केले आहे. याचाचं अर्थ ह्या सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे.
तरी मा.जिल्हाधिकारी साहेब आपणास विनंती करण्यात येते कि, आपण याकडे गांभिर्याने लक्ष देऊन नायगाव तालुक्यात व नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पडलेल्या 'येल्लो मोझ्याक' अळीमुळे झालेले नुकसान तसेच अन्य नुकसानीबाबतचे पंचनामे तसेच SDRF व NDRF च्या निकषानुसार अतिवृष्टी बाधित क्षेत्रास सहाय्यक अनुदान व पीकविमा मिळणेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश वरिष्ठ कार्यालयास कळवून शेतकऱ्यांना विमाकंपनीकडून व शासनाकडून आर्थिक सहाय्यता मिळून देण्याची कपा करावी व शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा हा प्रश्न मार्गी लावावा हि नम्र विनंती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा