'नारे तकबीर अल्हाह हू अकबर' च्या घोषणांचे नरसी दुमदुमली.
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
इस्लामचे धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे ईद-ए-मिलादुन्नबी च्या अनुषंगाने जुलूस ए मोहम्मदी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जुलूसमध्ये मुस्लिम बांधव,लहान मुले,मुली व परिसरातील समाजबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
दरवर्षी प्रमाणे यंदाही इस्लाम धर्मांचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दि.७ आॅक्टोंबर २०२३ रोजी नरसी येथे ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नारे तकबीर,अल्हाह हू अकबर च्या जयघोषाने नरसी दुमदुमली जागोजागी सरबत,फळे,चॉकलेट,बिस्किट व पाणी बॉटल वाटप करण्यात आले सकळी ८ वाजताच दारुउलूम अहले सुन्नत नुरीया मुखेड रोड महेबुब नगर येथून जुलूस ए मोहम्मदीला प्रारंभ झाले त्यानंतर मुखेड रोड या मार्गाने मुख्य चौक होत.
नांदेड हैदराबाद मार्ग करत बसस्थानक परिसर,बिलोली रोड मार्गावरून मगदूमनगर येथील मस्जिद येथे पोहचला त्यानंतर फातेहखानी सलाम व दुवा झाल्यानंतर त्याच मार्गाने जुने गाव नरसी येथील हजरत खाकीशहावल्ली यांच्या दर्गाह येथे जाऊन फतेहखानी सलाम व दुवा झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली सदर जुलूस यशस्वी करण्यासाठी जुलूस कमेटीचे अध्यक्ष हाजी मैंनोदिन खुरेशी,उपाध्यक्ष मोहीयोदीन शेख,रिझवान खूरेशी,रफिक पठाण,एजास रझा,सलीम शेख,रफिक शेख,मौला शेख,सादिक युसुफसाब,माजीद भाई,युनूस भाई,आरीफ बागवान,अलीम शेख,इरफान भाई टिपू,साबेर शेख,इम्रान पठाण,सय्यद वसीम,सय्यद एजास,मुझामिल रझा यासह नवयुवकांनी मोठे परिश्रम घेतले तर सदर जुलूस मध्ये मुस्लिम समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा