नांदेड येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाची पाहणी
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
नांदेड येथे झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा नियोजन सदस्या डॉ. सौ ज्योती खेडेकर यांनी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देवून औषधांचा साठा पुरेसा आहे कि नाही याची पाहणी केली सोबतच मशीनरी व साहीत्यांचा अभाव आहे की नाही याची चौकशी केली आणि वैद्यकीय डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून गोर गरीब जनेतेचे हाल होवू नाही या साठी विनंती केली.
यावेळी सोबत श्री. रवी तोडकर, श्री. शरद ढोरे श्री. सदानंद मोरगंजे, सय्यद मेहबूब, श्री. प्रमोद चिंचोले, श्री. प्रशांत डोंगरदिवे, श्री. प्रल्हाद सुरडकर, श्री. अक्षय वाघ उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा