maharashtra day, workers day, shivshahi news,

स्वेरीच्या प्रांगणात अवतरणार सळसळत्या तरुणाईचा कलाविष्कार

१९ व्या युवा महोत्सवासाठी 'स्वेरी कलापंढरी' ची तयारी अंतिम टप्प्यात
19th Youth Festival of Sweries College , Principal of Pandharpur Dr. B. P. Ronge , pandharpur , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १९ वा युवा महोत्सव पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे मंगळवार, दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजता होणार असून मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक व सचिव तथा स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवारी सकाळी दहा वाजता सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख व युवा लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. अध्यक्षस्थानी पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे असतील. दि. १० ते १३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नृत्य, नाट्य, ललित, वाड्मय, संगीत व लोककला विभागातील एकूण ३९ कलाप्रकारांच्या स्पर्धा या युवा महोत्सवात होणार आहेत. सुमारे ६० महाविद्यालये आणि जवळपास १६०० पेक्षा जास्त विद्यार्थी कलाकारांचा यामध्ये सहभाग राहील असा अंदाज आहे.
स्वेरीच्या युवा चेतना रॅलीने काही प्रातिनिधिक महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी कलावंतांना व रसिकांना या युवा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थी कलावंतांनी या युवा चेतना रॅलीला भरघोस प्रतिसाद दिला आहे. युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार, दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता रजिस्ट्रेशन, उद्घाटन समारंभ, संघ व्यवस्थापकांची बैठक झाल्यानंतर स्पर्धाना सुरुवात होईल. मूकनाट्य, समूहगीत, कातरकाम, भजन, प्रश्नमंजुषा (लेखी), मराठी-हिंदी-इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, भारुड, काव्यवाचन, भितीचित्रण, मेहंदी, लावणी आणि एकांकिकेचे सादरीकरण महोत्सवाच्या पहिल्या दिवशी होणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, पोवाडा, पथनाट्य, स्थळचित्रण, वादविवाद, लोक वाद्यवृंद, जलसा, शास्त्रीय सुरवादय, कथाकथन, मिमिक्री, व्यंगचित्र, कव्वाली आणि एकांकिका आदी स्पर्धा पार पडतील. गुरुवार दि. १२ ऑक्टोबर रोजी प्रश्नमंजुषा (तौडी), निर्मिती चित्र, शास्त्रीय गायन, पाश्चात्य समूहगायन, प्रहसन, पाश्चिमात्य वादन, रांगोळी, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम आणि लोकनृत्याच्या स्पर्धा रंगतील.
शुक्रवार, दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता शोभायात्रा पार पडल्यानंतर दुपारी एक वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे आणि युवा अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर है असतील तर कुलसचिव योगिनी धारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत आणि वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शहा यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यंदाच्या 'उन्मेष सृजनरंगाचा या युवामहोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. पाऊस आला तरी विना व्यत्यय स्पर्धा सुरु राहाव्या अशा पद्धतीने रंगमंच व्यवस्थापन केलेले आहे. सर्व रंगमंच्यासाठी उत्तम दर्जाची साऊंड तसेच लाईट व्यवस्था याचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ३० समित्यांचे गठन करण्यात आले असून, त्यांच्याद्वारे महाविद्यालयाचे संस्थापक व सचिव प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी. संघाव्यस्थापक, परीक्षक, मान्यवर यांच्या भोजन, निवास आदी व्यवस्थेचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, युवा महोत्सव आयोजन समिती सदस्य डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. डी. जी. शिंदे यांच्या पथकाने सर्व तयारीची पाहणी करून त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
'ट्रेड एक्स्पो २०२३' चे खास आकर्षण
युवा महोत्सवाचे औचित्य साधून स्वेरी नेहमी काही नवीन उपक्रम राबवित असते. याच परंपरेचा भाग म्हणून एम. बी. ए. विभागाच्या विद्याथ्र्यांनी प्रा. करण पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रेड एक्स्पो- २०२३' या उद्योग महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यामुळे रसिकांना एकाच महोत्सवात सांस्कृतिक आणि व्यवसाय क्षेत्रातील अश्या दोन महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे. जिल्ह्यातील कलावंतांची जपली स्मृती मुख्य रंगमंचाला कला वारकरी मुख्य रंगमंच, तर लोककलेच्या रंगमंचाला प्रसिद्ध लोककलावंत लावणीसम्राट के जानोबा (माऊली) यांचे नाव देण्यात आलेले आहे. वाड्मय कलाप्रकार जेष्ठ मराठी साहित्यिक के. द. मा. मिरासदार शब्दांगण मंचावर तर संगीत कला प्रकार जेष्ठ गायक कै. प्रल्हाद शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे. ललितकला प्रकाराच्या स्पर्धा के. कवी संजीव स्मृती कलादालनात पार पडणार आहेत.
या पत्रकार परिषदेस संस्थेचे अध्यक्ष श्री. दादासाहेब रोगे, जेष्ठ विश्वस्त श्री एन. एस. कागदे, जेष्ठ विश्वस्त श्री. एच. एम. बागल, जेष्ठ विश्वस्त श्री. धनंजय सालविठ्ठल, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, कॅम्पस प्रमुख डॉ. एम. एम. पवार, डिप्लीमा कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. मणियार, डी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रा. मांडवे, शैक्षणिक विभाग अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, सांस्कृतिक विभाग व संवादप्रमुख डॉ. यशपाल खेडकर, समन्वयक प्रा. करण पाटील, डॉ. महेश मठपती, डॉ. डी. एस. चौधरी विविध विभागांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !