प्रहार दिव्यांग संघटनेनी दिव्यांगाची केली विचारपूस
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्ह्य प्रतिनिधी, शिवाजी कुंटूरकर
दिनांक 04/10/2023 रोजी
मौजे बावलगाव ता.बिलोली येथील एकाच कुटुंबातील चार जन दिव्यांग आहेत. प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा प्रमुख मंगनाळे विठ्ठलराव यांनी कुंटूबाची भेट घेवुन गंगाबाई राजाराम माकलवार यांची विचारपुस केली तेव्हा मुलाचे वडील 2014 साली मयत झाले आहेत.शेत नाही, चारही मुलाचे पालन पोषण मी करते मोल मंजुरी करुन पोट भरते. निराधार योजना लाभ मिळतो.पण राहाण्या साठी घर नाही. घरात पाणी येते,साधे शौचालय नसल्याने संडास साठी घसरत घसरत जावे लागते. शासनाच्या योजनेचा लाभ नाही.
हे ऐकल्या नतर लगेच संरपच व ग्राम सेवकास फोन करुन पंचायत समिती बिलोली येथे लगेच बोलवले आणि गटविकास अधिकारी सिरसागर व गावचे सरपंच लक्ष्मण गायकवाड व ग्रामसेवक माताजी हांडे आजनीकर यांच्याशी चर्चा करण्यात आली गटविकास अधिकारी,ग्राम सेवक,सरपंच यांनी,लगेच ग्राम पंचायतच्या वतिने शौचालय बांधकाम करून देणार आसल्याचे प्रहार दिव्याग संघटनेचे जिल्हा प्रमुख मंगनाळे यांना व सर्वाचे आभार व्यक्त केले गरीब दिव्यांगास घरकुलाचा लाभ देणार आसल्याचे पण सांगीतले.संघटनेचे पदाअधिकारी व गावाकरी मंडळी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा