दुसरबीड गावचा विकास हा मागील एका महिन्यापासून खोळंबला
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
दुसरबीड गावचा विकास हा मागील एका महिन्यापासून खोळंबलेला आहे. गांव पुढाऱ्यामध्ये मतभेद असल्यामुळे बहुमतातील ग्रामपंचायत सदस्यामध्येच फुटाफुट झाल्याने गांवातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दुसरबीड ग्रामपंचायतमध्ये प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी सिंदखेड राजा तालुका काँग्रेसचे नेते जुनेद अली यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
सिंदखेडराजा पं.स.चे गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात जुनेद अली यांनी असे म्हटले आहे की, सद्या गणेश चतुर्थी, इद ए मिलाद हे सण झाले. परंतु आता येणारे नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी हे उत्सव समोर आहेत. मात्र गांवामध्ये विद्युत पोलवर लाईट लावणे, हायमस्ट लाईट बसविणे, नागरिकांचा सांडपाण्याचा विषय, रस्ते गरजेचे आहे. तसेच गांवातील नागरीकांना मागील दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्या करीता अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दलित वस्तीमध्ये पाणीपुरवठा नळ योजनेतील पाईपलाईन केली. परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत पाणी पुरवठा झालेला नसल्याचे निवेदनात नमुद असुन गावातील समस्यांचे निराकरण करणे व गावाचा विकास होण्याच्या दृष्टीकोनातुन सदर ग्रामपंचायतवर प्रशासकाची नेमणुक करण्याची मागणी देखील जुनेद अली यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा