फुलंब्री तालुक्यातील जलसुरक्षकाचे मानधन जिल्हा परिषद मध्ये पडूनच आहे.
शिवशाही वृत्तसेवा,भगवान जाधव, जिल्हा प्रतिनिधी फुलंब्री.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद गेले ४ महिन्यापासुन जलसुरक्षकाचे मानधन पडुन आहे.तसेच फुलंब्री तालुक्याचे ग्रामपंचायत जलसुरक्षकांचे गटविकास अधिकारी पंचायत समिती फुलंब्री यांनी सदरिल कर्मचारी यांची सिपारस व त्यांची यादी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे देऊन चार महिने झाले आहे.तरी पण आतापर्यंत कर्मचाऱ्यांना मानधन मिळाले नाही.
जर दि.२२/१०/२०२३ पर्यंत मानधन मिळाले नाही तर दि.२४/१०/२०२३पासुन पंचायत समिती फुलंब्री येथे उपोषण करण्यात येईल असे निवेदन तालुका युनियन अध्यक्ष डिगांबर जाधव यांनी दिले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा