चेअरमन अभिजीत पाटलांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
यावर्षी महाराष्ट्रात पर्जन्यमान कमी झाले आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे त्यामुळे सोलापूर जिल्हा संपूर्ण दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांना पंढरपूर मंगळवेढा भागातील दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली त्याचबरोबर उजनीत पाणीसाठा जो उपलब्ध आहे त्याचे योग्य नियोजन केल्यास सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची गरज पूर्ण होऊ शकते आणि दुष्काळाच्या झळा कमी होऊ शकतात त्यामुळे आपण यासंदर्भात मीटिंग घेऊन संबंधित विभागांना सूचना द्याव्यात अशी विनंती केली.
मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावे ही कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून ओळखली जातात. त्यात 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न भीषण आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळी भागामध्ये समावेश करावा आणि विविध धरणातून कालव्याद्वारे नदीद्वारे उपसा सिंचन योजना द्वारे मंगळवेढा ला वेळोवेळी पाण्याचे आवर्तन सोडावे अशी देखील विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा