सोयगाव तहसीलवर धनगर समाजाचा धडक मोर्चा
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी सोयगाव रईस शेख
जय मल्हार सेना सरसेनापती लहुजी शेवाळे महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत धनगर समाजाचा सोयगाव तहसीलवर धडक मोर्चा सोयगाव तहसीलवर जय मल्हार सेना सरसेनापती लहुजी शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाला घटनेतील तरतुदीनुसार अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात यासाठी सोयगाव तहसिलवर धनगर समाजाचा धडक मोर्चा धनगर समाजाचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे हा संताप व्यक्त करण्यासाठी व आरक्षण प्रश्न तातडीने मार्गी लावावा यासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून धनगर समाज पारंपारिक वेशात जागरण गोंधळ करत वाघ्या मुरळी सह मोर्चाला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसिल कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला व तहसीलदार मोहनलाल हरणे व नायब तहसीलदार मोरे यांना निवेदन देण्यात आले या मोर्चात सहभागी होण्यासाठी सावळदबारा, पळासखेड महानोर, सिल्लोड ,सोयागाव तालुका सह जय मल्हार सेना अध्यक्ष लहुजी शेवाळे, सुनील दुधे, शिवाजी बुढाळ,नाना साबळे, शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख दिलीप मंचे व महीला सह शेकडो धनगर बांधव मोर्चात सहभागी झाले होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा