एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त
शिवशाही वृत्तसेवा, छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी मिलिंदकुमार लांडगे)
दिनांक 10 ऑक्टोबर रोजी रात्री 09:00 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले हे त्यांचे पथकासह जामगाव परिसरात पेट्रालिंग करत असतांना त्यांना बातमीदारा मार्फत गोपनीय माहिती मिळाली कि, गंगापुर पोलीसांना पाहिजे असलेला सराईत आरोपी महेश काशिनाथ काळे राहणार जामगाव तालुका गंगापुर हा त्याचे गावी जामगाव येथे आला असुन तो रात्रीच्या वेळी दारू पिण्यासाठी जयहिंद साखर कारखाना परिसरात पायी जात असतो यावेळी त्याचे जवळ तो गावठी कट्टी जवळ बाळगतो.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व त्यांच्या पथकाने तात्काळ जामगावच्या दिशेने धाव घेवुन जयहिंद साखर कारखान्याच्या अलिकडे शेतात अंधारात आडोशाला सापळा लावला. यावेळी संशयीत ईसम महेश काळे हा दबा धरून बसलेल्या पोलीसांचे दिशेने येतांना नजरेस पडला तो पाहिजे असलेला आरोपी महेश काळे असल्याची खात्री होताच पोलीसांनी त्याच्या दिशेने धाव घेतली.
पोलीसांची चाहूल लागताच महेश काळे यांने अंधाराचा फायदा घेत जिल्हा परिषद शाळेच्या दिशेने पळत सुटला. पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्याला थोडयाच अंतरावर शिताफीने पकडले.
त्याला विश्वासात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश काशिनाथ काळे वय 28 वर्ष राहणार जामगाव तालुका गंगापूर असे सांगितले. त्याची अंगझडती घेतल्यावर त्याचे कमरेला एक स्टिलच्या धातुचा काळया रंगाचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस (राऊंड ) अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगतांना मिळुन आले आहे. गावठी कट्टा व काडतुस जप्त करण्यात आली आहेत. या आरोपी विरूध्द आतापर्यत प्राणघातक हल्ला करणे, चोरी, दरोडा, मारहाण, अवैध शस्त्र बाळगणे, विक्री करणे यासारखे 14 गंभीर गुन्हे दाखल असुन यापैकी 04 गंभीर गुन्हयात तो गंगापुर पोलीसांना पाहिजे होता.
त्याच्या विरूध्द पोलीस ठाणे गंगापुर येथे कलम 325 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास गंगापुर पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक वैजापूर महक स्वामी, गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पोलीस अंमलदार दिनकर थोरे, अमोल कांबळे, अभिजीत डहाळे, अतुल भवर, विजय नागरे, राहुल वडमारे, तेनसिंग राठोड, यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा