कृषी मेळाव्याला राहणार उपस्थित
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
दिनांक 13 ऑक्टोबर रोजी कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत सकाळी अकरा वाजता ते देऊळगाव राजा येथील स्वर्गीय भास्करराव शिंगणे कृषी मेळाव्याला उपस्थित राहणार असून दुपारी दोन दवाखान्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल.
मध्यरात्री ३:०० वाजता छत्रपती संभाजीनगर सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम, सकाळी ९ : ४५ वाजता देऊळगाव राजा कडे प्रयाण, सकाळी ११:०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती देऊळगाव राजा येथील सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे कृषी मेळावा कार्यक्रमाला उपस्थिती, १ :०० वाजता देऊळगाव राजा शासकीय विश्रामगृह येथे राखीव, २:०० वाजता अभिमन्यू दातांचा दवाखाना शुभारंभ, ३:०० वाजता श्री साई हॉस्पिटल शुभारंभ, त्यानंतर शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे आगमन व राखीव
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा