आरक्षणसाठी रेणापूर येथे मराठा समाज बांधव आक्रमक
शिवशाही वृत्तसेवा, लातूर (जिल्हा प्रतिनिधी उदयकुमार पाठक)
मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात राज्य शासनास एक महिन्याच्या ऐवजी चाळीस दिवस वेळ दिला असताना राज्य सरकारने आरक्षणाच्या बाबतीत अद्याप निर्णय झालेला नसल्यामुळे आंतरवली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेल्या मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील बरेच गावात कँडल मार्च फेरी साखळी उपोषण करण्यात येत असून दिनांक 30 ऑक्टोबर रोजी रेणापुर पानगाव फाटा या ठिकाणी खरोळा ,रेणापूर ,पानगाव कारेपूर या भागातील बरेच गावातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पानगाव फाटा या ठिकाणी चार तास चक्काजाम रस्ता रोको आंदोलन करून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सर्व समाजातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, अशा घोषणा देऊन राज्य सरकारला जागे करण्यासाठी व मराठा आमदार खासदार यानी मराठा समाजांच्या आरक्षण मागणी साठी उठाव करावा.
यासाठी तालूक्यातील गावागावात साखळी उपोषण,रस्ता रोको चक्काजाम आंदोलन सुरू असुन सोमवारी सकाळीरेणापूर खरोळा पानगाव फाटा येथील रस्ता रोको वचक्काजाम अंदोलनात मराठा अंदोलक कार्यकर्त्यानी सरकारने आमचा अंत पाहू नये अन्यथा आम्हास हातात रूमणे घ्यावे लागेल अशी भावना व्यक्त केली या रस्ता रोको चक्काजाम अंदोलनात . सकलमराठा कार्यकर्ते, संभाजी सेना पदाधिकारी, कार्यकर्ते, छावा पदाधिकारी, कार्यकर्ते, व इतर समाजाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते व या रस्ता रोको अंदोलन स्थळी तहसीलदार डॉ धम्मप्रिया गायकवाड यानी भेट दिली व रस्ता रोकोआंदोलन स्थळी पोलीस अधिकारी पीआय अंनत्रे व पीएसआय भंडे यांच्या उपस्थीतीत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा