लवकरात लवकर आरक्षण द्यावे
शिवशाही वृत्तसेवा नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील गेले सहा दिवस अन्न पाण्याचा त्याग करून मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसले आहेत ही खेदाची गोष्ट आहे की सरकारने आजपर्यंत ही तिथे प्रतिनिधी पाठवला नाही आणि आज या मराठा आरक्षणाचे सरकार व काही बेगडी लोक याचे राजकारण करत आहेत. संपूर्ण राज्यामध्ये आंदोलनाचा भडका उठत आहे आंदोलन अधिक तीव्र होत आहे जाळपोळ होत आहे. खरंतर समाजामध्ये आज हलाखीची परिस्थिती आहे, मुलांना शिक्षण देण्यासाठी आज मराठा कुटुंबांकडे आर्थिक परिस्थिती राहिलेली नाही जमीन अगदी गुंठ्यावर आली आहे त्यामध्ये सुद्धा सततची नापिकी यामुळे कुणबी मराठा शेतकरी आत्महत्या करत आहेत.
सरकारने यावेळी जर का मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही लावला तर याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रभर दिसतील.मनोज जरांगे पाटलांची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत जात आहे जर का सरकार चा हा विचार असेल की जरांगे पाटील मेल्यावरच आरक्षण देणार तर हे त्यांना परवडणार नाही जरांगे पाटलांना काही झाल्यास महाराष्ट्र पेटेल यात शंका नाही तरी सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकार असताना सांगितले होते की राज्य शासनाला काही अधिकार आहेत की राज्यातली परिस्थिती पाहता ते निर्णय घेता येतात असं देवेंद्र फडणवीस यांचं विरोधी पक्ष नेते असतानाचे स्टेटमेंट आहे. फडणवीस या मराठा आरक्षणाचे राजकारण करू पाहत आहेत. एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पंतप्रधान मोदी यांना बोलून यावर मार्ग काढावा अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील असे गजानन रामराव पाटील तमलुरे यांनी म्हटले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा