५ नोव्हेंबरला होणार मतदान तर ६ तारखेला होणार गाव कारभाऱ्यांचा फैसला
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
सिंदखेड राजा तालुक्यात सात ग्रामपंचायती साठी निवडणूक होणार आहे त्या मध्ये सवडद , तांदुळवाडी, पांग्री उगले, मोहाडी, वरोडी, दरेगाव, व नसीराबाद या गावांच्या निवडणुका होणार आहेत. ०७ ग्रामपंचायतींच्या उमेदवारांना १६ ऑक्टोंबर पासून २३ ऑक्टोंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. दिनांक २५ ऑक्टोंबर दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशन मागे घेण्याची मुदत असेल. दुपारी ३ वाजेनंतर चिन्ह वाटप होणार आहे ०५ नोव्हेंबरला मतदान आणि ०६ नोव्हेंबरला निकाल घोषित करण्यात येईल. त्यामुळे ग्रामपंचायत भावी उमेदवारांची आता पासून तयारी दिसून येत आहे. नेते आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचाराच्या तयारीला लागले आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा