मनसे तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष
सर्वत्र रस्त्यांचे उद्घाटन होत असताना सूपा गटातील रहदारीच्या म्हसने फाटा फेज २ एमआयडीसी शेजारील गावांकडे जाणारे रस्ते अतिशय दयनीय झाले आहेत. मींडा कंपनी पर्यन्त एमआयडीसी चा रस्ता आहे, त्या पासून जोडलेली बाबुर्डी विसापूर रोडची अवस्था हि पावसामुळे आणि एमआयडीसी मध्ये येणाऱ्या जड वाहनांमुळे अतिशय दयनीय झाली. त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधी व नेतेमंडळींचे लक्ष नाही. तसेच एमआयडीसी लगत अपधूप गावाकडे जाणारा रस्ता अतिशय दयनीय अणि निकृष्ट दर्जाचे झाले आहेत.
बाबूर्डी, अपधुप या गावांतील शाळकरी मुलांना शाळेत येण्या जाण्याचा हा रस्ता असल्याने त्यांना जाताना येताना जीव मुठीत धरून जावे यावे लागते. व त्या गावांमध्ये कंपनीमध्ये काम करणारे बाहेर गावातील कामगार राहत असतात व त्या कामगारांना दिवसा रात्री अपरात्री कामासाठी यावे लागते, रस्ते अतिशय अरुंद आणि मोठी मोठी खड्डे पडले असल्याने पावसाने त्या खड्ड्यात पाणी साचते आणि रात्री अपरात्री त्यांच्या वाहनांचा अपघात होतात. सर्वच नेतेमंडळी उद्घाटन शोबाजी करण्यात व्यस्त आहे. जिथे रस्त्यांची गरज आहे तिथे माञ सामान्य नागरिक रस्ता होण्याच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे वाट पाहत आहे. सर्वच नेतेमंडळी , लोकप्रतिनिधी आम्ही कसा विकास करतो अश्या पद्धतीने सर्वांची स्पर्धा लागलेली दिसते, परंतु जिथे रस्त्यांची गरज आहे त्या ठिकाणी कोणाचेही लक्ष नाही. जर या रस्त्याने जे अपघात होतात आणि होतील याला जबाबदार कोण?
येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची आणि कामगारांची गैरसोय होत असल्याने हे रस्ते चांगल्या प्रतीचे करण्यात यावे अशा पद्धतीचे निवेदन मनसे तालुका उपाध्यक्ष रविश रासकर व पारनेर शहराचे मनसे नेते सतीश म्हस्के यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, पारनेर अधिकारी SB होळकर,बांधकाम विभाग अहमदनगर यांना दिले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा