नवरात्रीच्या पहिल्या माळेला सगळी कडे उत्साहाचे वातावरण
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी जगदीश कोरी मठ
सोलापूर येथील रूपा भवानी मंदिर येथे सकाळ पासूनच देवी भक्तांची गर्दी वाढत आहे रात्री दहापर्यंत महिला व पुरुषांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या देवीच्या मंदिरासभोवती लाइटिंगची रोषणाईकरण्यात आली आहे हजारो भक्त व्यवस्थित दर्शन घेत आहेत मंदिर कमिटीने छान व्यवस्था केली आहे गर्दी वाढल्या नंतर चेंगराचेंगरी इ होऊ नये होऊ नये म्हणून मंदिरातून बाहेर जाण्यासाठी वेगळा मार्ग तयार केला आहे यंदा प्रथमच मंदिराच्या मंडपाच्या मध्यभागी पोलीस चौकी बनवली आहे त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे मंदिर प्रवेशद्वारा जवळ शेकडो खेळणी चे आणि पूजा साहित्याची दुकाने दिसून येत आहेत तसेच रूपा भवानी मंदिर जवळ प्रथमच गड्डा यात्रे प्रमाणे पाळणे देखील आले आहेत त्यामुळे बाळ गोपालांना खूपच आनंद मिळत आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा