आ रमेशआप्पा कराड यांच्या मागणीची दखल घेतली
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी, उदयकूमार पाठक लातूर
लातूर ग्रामीण विधानसभा कार्यक्षेत्रात असलेल्या पानगाव रेल्वे स्थानकातून जलद गतीने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे 9 ऑक्टोबर रोजी दिल्ली दौऱ्यात केली होती सदरील मागणीची दखल घेऊन संभाजीनगर - हैदराबाद - संभाजीनगर या एक्सप्रेस रेल्वेला पानगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना रावसाहेब दानवे पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी 9 ऑक्टोबर सोमवारी भेट घेऊन रेल्वे प्रवासाच्या आडीअडचणी बाबत सविस्तर चर्चा केली रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी नागपूर नंतर केवळ पानगाव येथेच आहेत या अस्थिच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून अनुयायी मोठ्या संख्येने पानगाव येथे येत असल्याने पानगाव येथील रेल्वे स्थानकावरून जलद गतीने धावणाऱ्या हैदराबाद संभाजीनगर यासह सर्वच रेल्वेंना थांबा देऊन होणारी जनतेची गैरसोय दूर करण्याची मागणी केली होती.
आ रमेशआप्पा कराड यांच्या मागणीची दखल घेऊन रेल्वे राज्यमंत्री ना रावसाहेब दानवे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या त्यानुसार हैदराबाद- संभाजीनगर -हैदराबाद रेल्वेला पानगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने 16 ऑक्टोबर 2023 रोजीच्या पत्रानुसार घेतला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली हैदराबाद संभाजीनगर हैदराबाद या रेल्वेचा थांबा कोरोना काळापासून बंद करण्यात आला होता आमदार रमेश आप्पा कराड यांच्या प्रयत्नामुळे सदर रेल्वेला पुन्हा थांबा देण्याचा निर्णय झाल्यामुळे पानगाव आणि परिसरातील सर्व स्तरातील नागरिकासह रेल्वे प्रवाशांनी आभार व्यक्त केले आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा