जालना घटनेमुळे राडा होण्याची शक्यता
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त दिनांक 3 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुलढाणा जिल्ह्यात येणार आहेत . परंतु काल जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पोलिसांकडून मराठा समाजावर झालेल्या मारहाणीचे पडसाद या कार्यक्रमाच्या वेळी उमटण्याची दाट शक्यता आहे. याआधीच शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या तारखा पुढे ढकलल्या गेल्या होत्या. तसेच कार्यक्रमाचे ठिकाणही बदलले होते. आधी या कार्यक्रमासाठी लोणार शहर निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर मेहकर येथे कार्यक्रम होणार होता. पण काही कारणास्तव या तारखां आणि ठिकाणांमध्ये मध्ये बदल करण्यात आला होता.
अखेर दिनांक 3 सप्टेंबर रोजी बुलडाणा शहरात हा कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले होते. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान जालना येथे झालेल्या लाठीमार घटनेच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात मराठा आंदोलक काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून ठीक ठिकाणी निषेध मोर्चे आंदोलने सुरू आहेत त्यातच उद्या बहुतेक सर्व शहरात बंदची हाक दिलेली असल्याने बुलढाणा येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा