महिलांनी बांधली पोलिसांना राखी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
पोलीस प्रशासन जे उत्सवाच्या दिवशी सुद्धा जनतेच्या सेवेत रुजू असते. नेहमी सर्व जनतेच्या रक्षणार्थ आपली सेवा जवाबदारीने पार पाडते.अशा पोलीस प्रशासनात काही पोलीस अधिकारी हे बाहेर गावचे असतात ते शहरात जनतेच्या सेवेत रुजू असतात त्यामुळे ते उत्सवाच्या दिवशी सुद्धा आपल्या गावाकडे जाऊ शकत नाहीत.
रक्षाबंधन सारख्या उत्सवाच्या दिवशी ते बहिणी कडून राखी सुद्धा बांधून घेऊ शकत नाहीत हे सर्व लक्षात घेऊन त्यांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा करने हे दरवर्षी विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गावहिनी कार्यकर्ते करत असतात. ह्या वर्षी सुद्धा रक्षाबंधन उत्सवाच्या दिवशी प्रत्येक पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील पोलीस बांधवाना राखी बांधून विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गावहिनी कार्यकर्त्यांनी रक्षाबंधन उत्सव साजरा केला. भाग्यनगर पोलीस स्टेशन, शिवाजी नगर पोलीस स्टेशन,एस पी ऑफिस,हनुमान पेठ पोलीस स्टेशन, इतवारा पोलीस स्टेशन येथे भेट देऊन रक्षाबंधन हा उत्सव साजरा करण्यात आला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा