होटाळा अण्णाभाऊ साठे जयंती प्रकरण
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील मौजे होटाळा येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त सायंकाळी ठीक आठ वाजता राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम चालू असताना सदर गावातील काही गावगुंडाने कार्यक्रम उधळून लावण्यासाठी जयंती निमित्त लावलेले बॅनर फाडून जनरेटर मध्ये पाणी टाकले असून या बाबतच्या मुख्य सूत्रधारासह गावगुंड समाजकंटकांना तात्काळ अटक करावे या मागणीसाठी रास्ता रोको करण्याचा इशारा लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा युवक उपाध्यक्ष गंगाधर कोतेवार यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांना निवेदन देण्यात आले आहे.
अण्णाभाऊ साठे यांची जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते अशी जातीयतेची मानसिकता असल्याने सदर कार्यक्रम उधळून लावण्यासाठी कट रचला गेला तर जयंती अण्णाभाऊ साठेची असली तरी लावण्यात आलेल्या सर्व बॅनरवर सर्वच महापुरुषांच्या प्रतिमा होत्या त्या देखील फाडून पायाखाली तोडून घाणीमध्ये फेकून देण्यात आले.
या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे,परंतु मुख्य सूत्रधारासह आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांना रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी मानवहित लोकशाही पक्षाचे तालुकाप्रमुख अक्षय भाऊ बोयाळ, युवक तालुकाप्रमुख पूनम भाऊ धम्मनवाडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष प्रभाकर घंटेवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे व्यापारी आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे, मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे राजेंद्र रेड्डी यासह नारायण गायकवाड, मारुती कांबळे, प्रशांत जाधव, विलास जाधव, माणिक कोतेवार, रमेश कोतेवार, मुन्ना कोतेवार, नागोराव बंडे, साहेबराव सुर्यकार यांची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा