प्रणव परिचारक यांची यशस्वी मध्यस्ती, उपोषण आंदोलन मागे
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
सोनके तिसंगी तलावातील पाणी सोडण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी २ सप्टेंबर रोजी दोन्ही गावे बंद ठेऊन आमरण उपोषण करण्यात आले.
जोपर्यंत तलावामध्ये पाणी सोडण्यात येणार नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरु राहिल, असे आंदोलन कर्त्यान कडून सांगण्यात आले होते.
या उपोषणाच्या स्थळी युवक नेते प्रणव परिचारक यांनी भेट देऊन आंदोलकांची परिस्थिती बघत, त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली, ह्या शेतकऱ्यांच्या अडचणींच्या, पाणाच्या लढाईत मी आपल्या सोबत असल्याचे सांगत पालकमंत्री महोदय श्री.राधाकृष्ण विखे-पाटील साहेब यांच्या सोबत फोनद्वारे संपर्क साधून सदर स्थितीची माहिती दिली, आणि त्यांना या पाणी प्रश्नांवर तोडगा काढण्याची विनंती केली, पालकमंत्री महोदयांनी यावर सकारात्मक मार्ग काढू असे आश्वासन परिचारक यांना दिले.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत याचा निर्णय होऊन पाण्याचे सुरु असलेले आवर्तन कायम ठेवत सोनके तिसंगी तलाव व कासेगाव, खर्डी, रांझणी, भागातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात आले.
आज उपोषण स्थळी प्रणव परिचारक यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांचा सन्मान करुन त्यांचे उपोषण मागे घेतले, त्यावेळी तिसंगी तलावा बरोबरच रांझणी, कासेगाव, खर्डी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच परत याच विषावर पुन्हा पुन्हा उपोषण आंदोलन करावे लागू नये यासाठी कालवा सल्लागार समितीने शासन दरबारी ठोस निर्णय करुन घ्यावा अशीही मागणी परिचारक यांनी केली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा