दहावीच्या विद्यार्थ्यांनी बजावली शिक्षकांची भूमिका
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच शिक्षण तज्ञ कैलासवासी गुरुवर्य त्रिंबक अभ्यंकर सर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले
इयत्ता दहावीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांची भूमिका बजावली व सर्व शालेय व्यवस्थापन त्यांनीच पाहिले सर्व वर्गात नवीन टीचर आलेले पाहून विद्यार्थीही आनंदात होते शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतांना काय अडचणी येतात याची कल्पना आली आजचे मुख्याध्यापक याची भूमिका कुमार हर्षद काळे व उप मुख्याध्यापक कुमारी प्राची काळुंगे यांचा सत्कार प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता मोहोळकर यांनी केला तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले प्रशालेतील महत्त्वाची भूमिका म्हणजे पिऊन ची भूमिका अतिशय उत्तम प्रकारे निभावल्याबद्दल प्रशाले कडून त्यांचाही सत्कार करण्यात आला
प्रशालेमध्ये नवीन शिक्षक पद घेतलेल्या आजच्या शिक्षकांनी म्हणजेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी केक कट करून कार्यक्रमाबद्दल आपले मत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दहावीच्या वर्ग शिक्षका वैशाली शिंदे व विषय शिक्षिका सौ दुरुगकर मीनाक्षी गायकवाड ज्ञानेश्वर मोटे तसेच सर्व वर्गशिक्षिका यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा