शेतकऱ्यांची होते आहे दिशाभूल व लूट
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
पिजीआर च्या नावाखाली शेतकऱ्याची होणारी अमाप लूट थांबवावी
भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून जगात ओळखला जातो. कारण येथे 70 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत पण त्यांना लुटण्यासाठी कोण कोण येते आणि लुट करून जाते हे नवीन नाही. परंतु सद्यस्थितीत पीजीआर अर्थात पीक संवर्धन उत्पादने या नावाखाली शेतकऱ्याची अमाप लुट होत आहे. ती तात्काळ थांबवावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे असा इशारा सामाजिक तथा नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते व सक्रिय कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण यांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे निवेदनाद्वारे कडक शब्दात इशारा दिला आहे.
अनेक समस्यांनी त्रस्त असलेले शेतकरी हे केले तर काय होईल ते केले तर जास्तीचे उत्पादन निर्माण होईल काय या विचाराने नवनवीन प्रयोग करत असतात. याचाच फायदा उठवून पीजीआर कंपनी या नावाने बोगस केमिकल विकत आहे. मात्र नायगाव तालुका कृषी अधिकारी हे झोपा काढत आहेत.
याबाबत शासनाने यांना परवानगी दिली किंवा नाही हे मात्र अद्याप माहित नाही. परंतु चढ्या दराने पीजीआर विक्री केला जात आहे. त्यामुळे बोगस कंपन्याचा परवाना तात्काळ रद्द करावा संबंधित आणि पी जी आर या कंपनी चालका विरुद्ध कडक व ठोस कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करण्यात येईल. काही विपरीत घडल्यास सर्व जबाबदार कृषी विभागाची राहील अशा इशारा गजानन पाटील चव्हाण यांनी निवेदनाद्वारे दिलेला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा