शासनाच्या विरोधात व्यक्त केला संताप
शिवशाही वृत्तसेवा, जालना (जिल्हा प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण)
मागील सोळा दिवसापासून अंतरवाली सराटी येथे मनोज पाटील जरांगे यांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे बुधवारी तब्बल १५५ मराठा बाधंवानी मुंडण करुन शासनच्या विरोधात संताप व्यक्त करीत निषेध केला आहे. यावेळी पारध पोलीसांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे बुधवारी मराठा आरक्षण मिळावे म्हणून मुंडण आंदोलनाचे नियोजन ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आले होते. यावेळी अवघडराव सांवगी याच्यासह, गावातील मराठा बांधव मुंडण आदोंलनात सहभागी झाले होते.
या मुंडण आंदोलनात अनेकांनी आपल्या भाषणातुन भावना व्यक्त करीत शासनाचा निषेध केला. तसेच आंदोलनात एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देण्यात आल्या. या मुंडण आंदोलनात गाव तसेच परिसरातील मराठी युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा