साखर आयुक्त यांना दिले निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (प्रतिनिधी विष्णू मुंगसे)
भेंडा -
सन 2021/22 मधील गळीत हंगामात कपात करण्यात आलेली प्रतिटन 109 रुपये शेतकऱ्यांना न दिल्यास लोकनेते मारोतराव घुले पाटील व ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना 23/24 च्या गळीत हंगामाला परवानगी देणार नसल्याचे साखर आयुक्त चंद्रकांत पूलकुडवार यांनी दिल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली एफआरपी रकमेतून कुठलीही कपात न करायचा केंद्र सरकारचा नियम नसताना ज्ञानेश्वरने कपात केली होती. त्या विरोधात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी साखर आयुक्ताकडे तक्रार केल्या, तसेच आंदोलन ही केली.
परंतु कारखान्याने 83 शेतकऱ्याच्या खात्यावर 109 रुपये प्रति टनाप्रमाणे पेमेंट वर्ग केले आणि यानंतरही प्रक्रिया थांबवली या बाबत मुरकुटे यांनी साखर आयुक्ताकडे तक्रार केली असता या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास ज्ञानेश्वरला येत्या गळीत हंगामात परवानगी दिली जाणार नाही. तसेच कपात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचै आदेश देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव अंकुशराव काळे, रितेश भंडारी, तालुका उपाध्यक्ष सूर्यकांत गुंड, आदी उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा