खासदार संजय राऊत यांनी काढले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे वाभाडे
शिवशाही वृत्तसेवा, मुंबई (सुरज गायकवाड)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते बंगले कुणाचे हे माहीत नाही पण त्यांची चावी अजय आशर या बिल्डरकडे आहे का? हे मुख्यमंत्र्यांना विचारा असं असं म्हणत थेट एकनाथ शिंदेंवर आरोपच केला आहे. आता अजय आशर हे बांधकाम व्यावसायिक कोण ? त्यांचा मुख्यामंत्र्याशी काय संबंध? असे अनेक प्रश्न राऊतांच्या विधानानंतर उपस्थित झाले आहे.
तसेच राज्यात तापत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुद्धा संजय राऊतांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. राज्य सरकार मनोज जरांगे पाटलांना मारू इच्छिते, सरकारला त्यांची कुठलीही चिंता नाही, असं म्हणत राऊतांनी हल्ला चढवला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिलेल्या उत्तरावरुनही संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ते बंगले कुणाचे हे माहीत नाही, पण त्यांची चावी अजय आशर या बिल्डरकडे आहे का? हे मुख्यमंत्र्यांना विचारा, असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासून राज्यात जाती-पातीचं राजकारण सुरू आहे. संभाजीनगर येथील बैठकीत अडथळा नको, म्हणून मनोज जरांगे पाटील यांना गुंडाळलं जात आहे. पण तो गुंडाळला जाणारा माणूस नाही. धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणणारे, आता का देत नाहीत? असा सवालही राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. आता राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला शिंदे गटासह भाजपा काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा