आंतरगाव ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या साठी मागील अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज पाटील जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनाला बळ देण्यासाठी व राज्य सरकार मराठा आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे नायगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले गजानन पा.कदम व सतीश पा.कदम यांना पाठबळ म्हणून नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे आंतरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि.५|९|२०२३ रोजी मासिक सभा झाली.
असुन या मासिक सभेमध्ये संरपंच गजानन पाटील तोडे, उपसरपंच दत्ता पाटील तोडे व ग्रामपंचायत सदस्य यांनी या मासिक सभेमध्ये मराठा समाजास आरक्षण मिळवून दिले पाहिजे कारण मराठा समाजातील शिक्षण शिकलेले व शाळेत शिक्षण घेत आसलेल्या बहुतांस मुला मुलींच्या शाळेतील प्रवेशफार्मवर मराठा आसा उल्लेख आहे,आसे सुचकांच्या सांगण्यावरून या मासिक सभेत चर्चा करुन ठराव क्रमांक -५ पास करण्यात आला की मराठा समाजास जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत येणाऱ्या पुढील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वानुमते घेऊन दि. ११|९|२०२३ रोजी नायगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार मंजुषा भगत यांना निवेदन देण्यात आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा