वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध जाती धर्माचे प्रतिनिधी, व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील नरसी शहरात नांदेड जिल्हा पोलीस व रामतीर्थ पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या गणेश उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आले होते. यावेळी काही राजकीय व्यक्तींनीआपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, तुळजाभवानी जिनिंगचे चेअरमन श्रावण पाटील भिलवंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगाव, अशोक पाटील मुगावकर, उद्योगजक प्रकाश पाटील भिलवंडे, काँग्रेसचे राजू गंदीगुडे, राष्ट्रवादी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे, काँग्रेसचे माधव कंधारे, नांदेड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, माधव वाघमारे, काँग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सय्यद इसाक,
नरसीचे पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल , तसेच नांदेड जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, बिलोली विभागाचे पोलीस उपाधिकारी बाळकृष्ण पाटील व रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संकेत दिघे यांच्यासह, विविध राजकीय पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी नरसी व पंचक्रोशीतील प्रमुख गावकारभारी, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष, सर्व धर्मीय विविध जयंती मंडळाचे पदाधिकारी, विविध गणेश मंडळाचे पदाधीकारी व पत्रकार बांधव मोठ्या उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा