शेतकऱ्याचा साथीदार असलेल्या बैलांचे कोड कौतुक
शिवशाही वृत्तसेवा, लातूर (जिल्हा प्रतिनिधी उदयकुमार पाठक)
रेणापूर दिनांक - १४ सप्टेंबर
जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या संपूर्ण शेतीचा भार वाहणाऱ्या सर्जा राजाचा बैलपोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. आधुनिक तांत्रिक युगात ट्रॅक्टरने शेती केली जात असली तरी सुद्धा खेड्यापाड्यात बैला शिवाय शेतीची बरीच कामे केली जात असून बैलांना सजवून मिरवणूक काढण्याची हौस काही वेगळीच असते.
बैलांना सजविण्यासाठी झुली, बाशिंग, म्होरकी,शेंदूर कलर, घुंगरू, कासरा, कवडीमाळा आदी साहित्य महाग असले तरी शेतकऱ्यांनी मुक्या जीवाची हौस पुरवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून नंतरच शेतकरी उपवास सोडतात.
यंदा पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे पिके जेमतेम आली परंतु चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पावसाळा संपत आला, तरीसुद्धा नदी, नाल्या, विहिरी कोरडे ठाक पडलेले आहेत.अशा परिस्थितीत सुद्धा बैल पोळा उत्साहात साजरा करून आनंदाने व उत्साहाने बैल राजाचे पूजन केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा