नायगाव पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुरकर)
नायगवच्या शांततेचे नाव जिल्ह्यात परिचित असून त्या नावाला धक्का लागणार नाही असे कृत्य न करता शांतता अबाधित ठेवूनच सण उस्तव साजरे करावेत व नायगाव ची शांतता कायम ठेवा असे आवाहन नायगाव ठाण्याच्या पो.नि.श्रीमतीवसुंधरा बोरगावकर यांनी शांतता समिती बैठकीत मार्गदर्शन करताना केले.
नायगाव गणेश उत्सव व या काळात येणारे सण उस्तव शांततेत पार पाडले जावे शासनाचे कोणतेही जे नियम आहेत, त्याचे उल्लंघन होता कामा नये व पोलिसांना सहकार्य करावे यासाठी नायगाव पोलीस ठाणे येथे तहसीलदार सौ. मंजुषा भगत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली.
नायगाव पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या शांतता समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सौ.मंजुषा भगत तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी एल आर वाजे, नगरपंचायत नायगावचे कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव, महावितरण कंपनीचे अभियंता दुधमल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी धाबे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनकांबळे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.
गणपती मंडळ समाज बांधव व प्रतिष्टीत प्रमुख नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित शांतता समिती बैठकीत पोलीस ठाण्याच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मानकरण्यात आला. पोलीस निरीक्षक अधिकारी सौ. वसुंधरा बोरगावकर यांनी गणेश उत्सवामधील सर्व नियमावलीची सविस्तर भूमिका मांडली. यावेळी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिक पाटील चव्हाण, पत्रकार प्रकाश हनुमंते, मारोतराव कतुरवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तहसीलदार मंजुषा भगत यांनीही आपले विचार व्यक्त करताना शांतता अबाधित ठेवण्या साठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.कोण्ही कायदा हातात घेत असेल तर असे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे स्पष्ट ताकीद वजा सूचना दिल्या. सूत्रसंचालन व आभार बालाजी शिंदे यांनी मानले. बैठक यशस्वीपणे पार पडण्या साठी पो.उ.नि.बाचावार, वळगे, वाघमारे, संदीप कुलकर्णी, सांगवीकर या सह पोलीसांनी परिश्रम घेतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा