अभ्यासू आणि आक्रमक कार्यकर्ता अशी राहुल शिंदे यांची प्रतिमा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
आगामी काळातील निवडणूका लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली असुन भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक बांधणीसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. नायगाव युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदासाठी राहुल पाटील शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रदीर्घ काळ राहुल शिंदे यांनी तालुक्यात आपल्या कामाचा ठसा उमटवत ठेवला होता.
परंतु पक्षांतर्गत कुरघोडीला कंटाळून शिंदे यांनी मनसेला रामराम ठोकला व नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांच्या विकासात्मक कामाला प्रेरीत होऊन आपण भारतीय जनता पक्षात राजेश पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला अशी प्रतिक्रिया राहुल शिंदे यांनी दिली. नायगाव तालुक्यातील एक अभ्यासू आणि आक्रमक कार्यकर्ता अशी राहुल शिंदे यांची जनमानसात प्रतिमा असून त्यांची युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा