जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील रातोळी येथील रहिवाशी सेवा सहकारी सोसायटी रातोळी चे चेअरमन अंकुश चंद्रभान पाटील रातोळीकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नायगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून अंकुश पाटील रातोळीकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नायगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पदी निवडीचे नांदेड जिल्ह्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष हरीहरराव वि. भोसीकर यांच्या हस्ते दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले.
आगामी लोकसभा आणी विधानसभा निवडणुकीच्या अनुसंघाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नायगाव तालुक्या मध्ये मजबूत संघटन बांधणीला सुरुवात झालेली आहे.आपल्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपने पार पाडू व जिद्दीने नायगाव तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची ताकत वाढविण्यासाठी कामाला लागु असे आमच्या दैनिक वैराग्य मुर्ती चे नांदेड जिल्ह्य प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर यांच्याशी बोलताना सांगितले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा