एकच मिशन मराठा आरक्षण व एक मराठा लाख मराठा घोषणांनी परिसर दणाणला
शिवशाही वृत्तसेवा, लातूर (जिल्हा प्रतिनिधी उदयकुमार पाठक)
रेणापूर - दिनांक १३ सप्टेंबर २०२३
पानगाव व परिसरातील सकल मराठा समाज बांधवांनी पानगाव ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेणापूर अशी भव्य मोटार सायकल रॅली काढली होती.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. तर त्यांच्या समर्थनार्थ रेणापूर येथे योगेश देशमुख, संतोष शिंदे, धनंजय भोसले व अजय गाडे हे समाज बांधव आमरण उपोषण करत आहेत.
या दोन्ही आंदोलनाला आणि उपोषणकर्त्या समाज बांधवांना पाठिंबा दर्शवण्यासाठी चंद्रचूड चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली.
या रैली मध्ये चंद्रचूड चव्हाण. पानगावचे उपसरपंच शिवाजी आचार्य, विवेक चव्हाण, सिध्देश्वर गालफाडे, अभिजीत चव्हाण, किरण हाणवते, निळकंठेश्वर चव्हाण, कृष्णा चव्हाण, आनंद सूर्यवंशी, तुकाराम पाटील, धैर्यशील शेंडगे, प्रसाद जाधव, श्याम जाधव, गणेश चव्हाण, बालाजी हनवते, गिरी हनवाते, यांच्या सह अनेक मराठा युवक सहभागी झाले होते. मराठा आरक्षण मिळालेच पाहीजे, एकच मिशन मराठा आरक्षण, आणि एक मराठा लाख मराठाअशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा