कुणबी मराठा असलेला पुरावा केला सादर
शिवशाही वृत्तसेवा, लातूर (जिल्हा प्रतिनिधी उदयकुमार पाठक)
रेणापूर - दिनांक १३ सप्टेंबर २०२३
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या 14 दिवसापासून उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांची पानगावच्या मराठा समाज बांधवांनी भेट घेतली व पानगाव मधील नामदेवराव चव्हाण यांच्याकडे असलेला कुणबी मराठा हा पुरावा सादर केला .व उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. यावेळी युवकांनी जरांगे पाटलांची तब्येतीची विचारपूस करून त्यांचे मार्गदर्शन घेतले .
या युवकांमध्ये अमरसिंह चव्हाण .महेश चव्हाण . विशाल चव्हाण . नंदकुमार चव्हाण . नामदेव जाधव मयुर चव्हाण . जयराम जाधव आदीसह युवक सहभागी होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा