पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून होऊ द्या चर्चा कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा लातूर जिल्हा प्रतिनिधी उदयकुमार पाठक
रेणापूर - दिनांक 23 सप्टेंबर 2023
रेणापूर तालुक्यातील शेरा येथे शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून लातूर जिल्ह्यातील रेनापुर तालुक्यात शेरा येथे होऊ द्या चर्चा या कार्यक्रमत जनतेशी व व्यापाऱ्यांची संवाद साधताना म्हणाले की खोटी आश्वासने देऊन केंद्र जाऊन बसलेले आहे .काळा धन ज्या ज्या व्यक्तीकडे जमा आहे त्यांचा काळा धन घेऊन त्यांना भारतात आणू म्हणून आश्वासन दिले होते ते पूर्ण केले का, काळा धन वापस आला नाही 15 लाख मिळाले नाही.शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर ईढीची चौकशी लावून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करत भाजपमध्ये असलेले पदाधिकारी भ्रष्टाचारी नाहीत का, त्यांच्यावर का लावली जात नाही ईडी.आशे मत लातूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख मा.आमदार रोहिदास चव्हाण यांनी केले. शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्ड यांनी होऊ द्या की चर्चा मध्ये जनतेशी व व्यापाऱ्याशी संवाद साधताना म्हणाली की गॅसचे दर, पेट्रोलचे दर, डिझेलचे दर, सर्वात जास्त वाढले.
केंद्रातून गॅसचे भाव कमी केला, पण कड धान्याचे भाव झपटाने वाढविले असे मत बालाजी रेड्डी यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे नियोजन सूर्यकांत चव्हाण यांनी केले होते. यावेळी उपस्थित लोकसभा निरीक्षक उद्धवराव कदम, मा. चौगुले साहेब, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे तालुकाप्रमुख ॲड. प्रवीण मगर पोलीस पाटील मारुती भुरे बालाजी कस्पटे ,रामकृष्ण आकंनगिरे, संजय सुडे, सुभाष गुंडीले ,शिवाजी माने ,पप्पू कुलकर्णी, पप्पू माने, बालाजी कुकाले, बालाजी कदम, माणिक सोनवणे गावातील जेष्ठ मंडळी, शेतकरी,शिवसैनिक व्यापारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या होऊन जाऊदे चर्चा ला नागरिकांच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा