एका तिकीटासाठी मोजावे लागणार तब्बल ४५ लाख रुपये
शिवशाही वृत्तसेवा, विशेष वृत्त
पुढील महिन्यात विश्वचषक - २०२३ चा थरार ५ ऑक्टोबर रोजी पासून रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अहमदाबाद येथे होणार आहे. तर भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे होणार आहे. सर्वात लोकप्रिय भारत- पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. या सामन्यांच्या तिकिटांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. काही बुकिंग वेबसाईट्सनी भारताच्या सामन्यांची सर्व तिकिटे विकली आहेत, तर काही तिकिटे अद्याप वेबसाईटवर उपलब्ध आहेत. पण त्यांच्या किमती खूपच जास्त आहेत.
एका तिकीट संकेतस्थळावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्याच्या तिकिटांची लाखोंमध्ये विक्री होत आहे. वेबसाईटवर, वरच्या श्रेणीतील तिकिटाची किंमत ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे दिसत आहे. या वेबसाईटवर तिकिटाची सर्वात कमी किंमत ८० हजार रुपये आहे. तर इतर अनेक तिकीट विक्री वेबसाईट वरील भारताच्या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा