पंकजाताई मुंडे यांची श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना
भारतीय जनता पार्टीच्या नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे सध्या शिवशक्ती परिक्रमा करत आहेत. महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळांना भेटी देऊन दर्शन करत आहेत. यामध्ये परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, भीमाशंकर, जेजुरीचा खंडोबा, कोल्हापूरची महालक्ष्मी, पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ, गाणगापूर गुरुदेव दत्त, तुळजाभवानी, इत्यादी देवस्थानांना दर्शन करण्यासाठी ही परिक्रमा करत आहेत. दरम्यान या परिक्रमेसाठी पंकजाताई मुंडे ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी त्यांचे भव्य दिव्य स्वागत होत आहे लोक त्यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी करत आहेत. जागोजागी त्यांचे जंगी स्वागत होत असल्याचे दिसत आहे.
पंकजाताई मुंडे यांचे पंढरपुरात जंगी स्वागत
गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी शिवशक्ती परिक्रमेच्या निमित्ताने पंकजाताई मुंडे पंढरपूर येथे आल्या होत्या. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी तसेच वंजारी सेवा संघ व इतर संघटनांनी त्यांचे मंदिर परिसरात भव्य दिव्य स्वागत केले. पंकजाताई मुंडे यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे विधिपद पूजा चर्चा करून मनोभावे दर्शन घेतले.
स्व. गोपीनाथ मुंडे साहेब विठ्ठलाचे भक्त
गोपीनाथ मुंडे साहेब हे देखील त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठलाच्या दर्शनाने करत असत मीही तशीच आहे कारण विठ्ठल हा सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा देव आहे असे पंकजाताई मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनतेने झोळी फाटे पर्यंत जे प्रेम आम्हाला दिले ते अखंड राहू दे अशी प्रार्थना आपण श्री विठ्ठल रुक्मिणीला केल्याचे देखील सांगितले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा