maharashtra day, workers day, shivshahi news,

एस.टी बसची विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या मॅक्झिमो गाडीला जोरदार धडक

गाडीचा चक्काचूर, अठरा विद्यार्थी जखमी, तर चालक गंभीर 
ST bus collided with student car, Car wrecked, eighteen students injured, driver serious, sinndkhedraja, buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
दुसरबीड इथून जवळच असलेल्या मलकापूर पांगरा-  बीबी रोडवर शाळेचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या मॅक्झिमो गाडीला भरधाव येणाऱ्या एसटी बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात अठरा विद्यार्थी आणि मॅक्झिमो चालक जखमी झाल्याची घटना आज दि 7 सप्टेंबर रोजी बीबी मांडवा रस्त्यावरील आनंद मंगल कार्यालयाजवळ घडली असून सदर आपघातातील चालक आणि काही विद्यार्थी यांना  उपचारासाठी जालना रेफर करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहितीनुसार बिबी येथील सहकार विद्या मंदिराची मॅक्झिमो गाडी क्र mH 28 v 5561 सावखेड नागरे  डोरवी, मलकावर पांग्रा, येथून दररोज शाळेत विद्यार्थी घेऊन जातात नेहमीप्रमाणे आज सकाळी विद्यार्थी घेऊन जात असताना मांडवा बीबी रस्त्यावर एका वळणावर   एम एच 40 ए क्यू 62 58 या क्रमांकाची चिखला बुलढाणा ही समोरून येणारी भरधाव  बसने समोरासमोर मॅक्झिमो गाडीला जोरदार धडक दिली यावेळी पाऊस सुरू असल्याने दोन्ही गाडीचे ब्रेक लागले नाही त्यामुळे अपघात झाला असावा अशी चर्चा होती. अपघात घडला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एकच कल्लोळ केला त्याच वेळेस सहकार विद्या मंदिर च्या बस जात असताना त्यांनी अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना तातडीची मदत करून उपचारासाठी बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले 
या अपघातात समर्थ रामप्रसाद शिंदे, धनराज योगेश शिंदे, अक्षय गजानन मुरकुट, पार्थ अतुल शेळके, सुदर्शन अंबादास शिंदे, राधा गजानन मुरकुट, ओम रामेश्वर उगले, धनराज गजानन पालवे, कार्तिक रामेश्वर उगले ,स्वाती शिवाजी पाचपोर, भागवत ज्ञानेश्वर उगले, निवृत्ती रत्नाकर पंखुले, दिपाली योगेश शिंदे ,सार्थक मंगळवेढे, समर्थ नागरे, लक्ष्मी शिंदे, लक्ष्मी गणेश गर्जे ,असे अठरा विद्यार्थी जखमी झाले तर मॅक्झिमो चा चालक गजानन पालवे, हा गाडीत फसल्याने टामि आणि गजने दरवाजा वाकवून त्याला बाहेर काढले ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी जखमीना जालना येथे नेण्यात आल्याची माहीती आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !