maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपूरात सर्व संघटना,पक्षीय, शेतकरी, आक्रोश मोर्चा

मोर्चात सहभागी होण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे आवाहन

In Pandharpur, all organizations, parties, farmers, protest march , Chairman Abhijit Patil , pandharpur , mangalwedha , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

उद्या विठ्ठल परिवार तसेच सर्व पक्षीय, संघटना यांचा आक्रोश शेतकरी मोर्चाचे अयोजन दि.०४सष्टेंबर २०२३रोजी सकाळी९वा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पंढरपूर तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात येणार आहे.

पंढरपूर, मंगळवेढा तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, सर्व संघटना, सर्व पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते व सहकारी यांना जाहीर आवाहन करणे करण्यात येते की, आपल्या परिसरात अत्यअल्प पाऊस झाल्यामुळे पाण्याअभावी पिके करपू व जळू लागले आहेत.  माणसांना व जनावरांना पाणी मिळेनासे झाले आहे. तसेच चारा व नदीकाठच्या व कॅनॉलवर अवलंबून असणाऱ्या गाव-गावच्या पाणीपुरवठा व मोठ्या शहरांच्या पाणी पुरवठ्याच्या योजना देखील पाण्याअभावी बंद पडत आहेत.


 पाणी सोडण्याची मागणी करून पाणी सोडले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वीज पुरवठा देखील खंडित केला जात आहे. अशा परिस्थितीत पक्ष पार्टीच्या पुढे जाऊन सर्व पक्षांनी सर्व संघटनांनी शेतकरी बांधवांनी शेतकरी हितासाठी यल्गार पुकारला आहे. या झोपलेल्या सरकारला जागे करूया आणि शेतकरी हितासाठी एकत्र येऊया..

यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी आवाहन केले आहे..

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !