बालाजी मंदिर नरसी समितीच्या वतीने शंभो ग्रुपचा सन्मान सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
श्रावण महिन्यात महादेवाची पूजा अर्चा करणे नामस्मरण घेणे महादेवाचं दर्शन घेणे याला अनन्य साधारण महत्व असल्यामुळे नायगाव येथील तरुण तथा वैश्य समाजातील युवकांनी एकत्र येऊन शंभो युवा मंडळ स्थापन करून श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक प्रसिद्ध महादेवाच्या मंदिरात जाऊन तीस दिवस प्रत्येक दिवशी एक गाव एक महादेवाची प्रत्येक दिवशी एका गावात जाऊन महादेवाची पूजा आर्चा अभिषेक आरती प्रसाद पूजा करून नंतर सर्व युवकांनी आपले रोजचे व्यवहार ची सुरुवात केली.
नायगाव तालुक्यात शंभू युवा मंडळाच्या वतीने जो उपक्रम राबवला त्या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे श्रावण महिन्यात तीस गावातील प्रत्येक गावांच्या महादेवाचे नावे पुढीलप्रमाणे आहेत. नायगाव, देगाव, खैरगाव, लालवंडी, कुंटूर, सातेगाव, बळेगाव, इकळीमाळ,लोहगाव,तळणी,उमरी,कृष्णुर,एमआयडीसी,होटाळा,धानोरा,तमा,मरवाळी,नागठाणा,धनज,बोरी.कंधार,रामतीर्थ,केदार,वडगाव,काळेश्वर,औंढा,नागनाथ;परळीवैजनाथ,टाकळगाव,नरसी,कुंभरगाव,पेठवडज. बारूळ, ताकबीड,राजगड नगर,गंगनबीड,शेळगाव छत्री, असे दर्शन शंभो युवा मंडळाने घेतले आहे.
यातील युवकअविनाश चालीकवार,ओम साई मूनगिलवार,प्रतीक पाळेकर, बालाजी डोंगळीकर,केदार मेडेवार,सचिन कवटीकवार, मनोज अरगुलवार,साईराम कोत्तावार,सिद्धेश्वर सुताडे,विषवनाथ मेडेवार,अमोल गंदेवार,प्रणव गडपल्लेवार,संदीप पत्तेवार,कैलास कवटीकवार, बालाजी केशटवार .श्रीनिवास रुद्रावार,साईनाथ बच्चेवार, अमर पदमवार,जगदीश प्रतापवार या सर्वांनी एकत्र येऊन श्रावण महिन्यात महादेवाचे दर्शन घेऊन श्रावण महिन्यात यात्रा करून आल्यामुळे विशेष उपक्रम राबविल्याबद्दल नरसी भगवान बालाजी मंदिराच्या वतीने सर्व शंभो युवा मंडळाच्या युवकांचा सन्मान करण्यात आला.
तसेच शंभू युवा मंडळाच्या युवकांनी एकत्र मिळून महाप्रसाद भंडाराचे आयोजन 17 सप्टेंबर 2023 रोज रविवारी नायगाव तालुक्यातील प्रसिद्ध पुरातन कालीन गंगनबीड महादेव मंदिर येथे भंडाऱ्याचे आयोजन केले असून परिसरातील लोकांना महाप्रसाद घेण्यासाठीसर्व युवकांनी आहवान करून विनंती केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा