उद्धव ठाकरे गटाला टक्कर देण्यासाठी शिंदे गटाची नवी खेळी
शिवशाही वृत्तसेवा, मुंबई (सुरज गायकवाड)
एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून थेट भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करून युतीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे धनुष्यबाण या चिन्हावर आपला हक्क सांगितला अशातच हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले मात्र शिवसेना भावनावर सुद्धा शिंदे गट हक्क सांगत असल्याच्या चर्चा होत होत्या.
अशातच आता शिंदे गटाने थेट उद्धव ठाकरे गटाचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या शिवसेना भवनाजवळ आपल्या नव्या शाखेचा शुभारंभ केला आहे. त्यामुळे कुठेतरी थेट उद्धव ठाकरे गटाला टक्कर देण्यासाठी शिंदे गटाने ही नवी खेळी खेळली आहे. सध्या या मतदार संघात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे वर्चस्व असून याच मतदार संघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान आहे त्यामुळे या मतदार संघाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार आज शाखा क्रमांक १९४ चे आज उद्धघाटन मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे याचवेळी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी विशेष बसेसही सोडण्यात येणार आहे. शिवसेना भवनसमोरच स्थानिक आमदार सदा सरवणकर यांची शाखा सुरू होणार असल्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार सदा सरवणकर यांनी कोल्हापूर येथे बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप लगावले होते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे घर जाळण्यासाठी उद्धव ठाकरे च्या आदेशाने संजय राऊत यांनीच मला सांगितले होते असा आरोपच सरवणकर यांनी लगावला होता अशातच आता थेट सरवणकर यांनी शिवसेना भवनाजवळ शाखा सुरु करून उद्धव ठाकरे गटाला आवाहन दिले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा