नांदेड जिल्ह्यातील लढवय्या महिला कार्यकर्त्या अशी ओळख, आगामी निवडणुकीत भाजपला होणार फायदा?
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
दहा वर्षा पासुन भाजपा मध्ये सक्रीय काम करत असलेल्या माजी जि.प.सदस्या सौ. पुनमताई राजेश पवार यांच्यावर पक्षाने मोठी जवाबदारी टाकत त्यांची महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
कै.संभाजीराव पवार यांनी जिल्ह्यात भाजपाला चांगले दिवस आणले होते .त्यामुळेच भाजप जिल्ह्यात टिकून राहीली होती.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आ.राजेश पवार व पुनमताई पवार हे दोघेही गेल्या दहा वर्षा पासुन भाजपमध्ये काम करीत आहेत .राजेश पवार हे आमदार झाल्यापासुन मतदार संघाच्या विकासासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी खेचून आणले आहेत .त्यांच्या कामाचे मतदार संघात मतदारातुन कौतुक होत आहे. भाजपाच्या रणरागिणी पुनमताई पवार ह्या माजंरम जिल्हा परिषद गटातून निवडून येऊन पाच वर्ष जिल्हा परिषदेत विकास कामासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरूद्ध अनेक वेळा आवाज उठवित प्रशासकीय अधिकारी व जिल्हा परिषदे मधील अध्यक्ष उपाध्यक्ष सभापतींना घाम फोडला होता .जिल्हा परिषद मध्ये भाजपाची सत्ता नसतांना सुध्दा पुनमताई पवार यांनी माजंरम सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केले. तसेच नायगाव तालुक्यात त्यांनी आज पर्यंत अनेक लोकाभिमुक अभियान राबविले आहेत .तसेच महीलासाठी ही त्यांनी अनेक अभियान राबविले ते नेहमीच अडचणीत असलेल्या लोकांसाठी मदत करीत असतात .
नुकतेच भारतीय जनता पक्षा कडून नविन कार्यकरणी जाहीर करण्यात आली या मध्ये महीला असुन सुध्दा पक्षाच्या कामात सक्रीय असलेल्या पुनमताई राजेश पवार यांची महीला मोर्चा च्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली . एक हुशार महीला म्हणून ओळख असलेलूया पुनमताई पवार यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने त्या येणा-यां काळात महीलासाठी काम करत पक्षाला फायदा करून देतील तसेच पुनमताई पवार यांची निवड झाल्याने येणा-या जिल्हा परिषद, विधानसभा , लोकसभा निवडणूकीत पक्षाला चांगलाच फायदा होईल असे बोलले जात असुन त्याच्या ह्या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा