वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. अलकाताई जायभाये यांचा आंदोलनाचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
सिंदखेडराजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, दारु विक्री, तसेच मटका ,जुगार सर्रासपणे सुरू आहे. यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. महिलांना देखील मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दारु विक्री गावातच सुरू असल्याने शांततेचा भंग होत असून, तरुण वर्गही दारूच्या आहारी गेला आहे. दारूमुळे अनेक जणांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत.
त्यामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व अवैध दारु विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करून अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी करणारे निवेदन वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. अलकाताई जायभाये यांच्या वतीने देण्यात आले आहे. जर अवैध धंदे बंद झाले नाही तर वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. अलकाताई जायभाये यांनी किनगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक यांना निवेदन दिले त्यावेळी रामप्रसाद जायभाये, शरद ससाणे, सुरेंद्र सोनपसारे आदी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा