कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये अभियंता दिन विविध उपक्रमातून संपन्न.
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
दरवर्षी 15 सप्टेंबर हा दिवस भारतात 'अभियंता दिन' म्हणून साजरा केला जातो. खर तर हा दिवस भारताचे महान अभियंता आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन आहे. अभियांत्रिकीच्या ज्ञानाचा वापर देशाच्या विकासात करून भारत देशाला त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. कोणत्याही देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास अभियंत्यांशिवाय अशक्य आहे कारण अभियंत्याच्या अथक परिश्रमामुळेच आपण नवीन तंत्रज्ञान वापरू शकतो. भारत देशाला आत्मनिर्भर बनविण्यामद्धे अभियंत्यांचा मोलाचा वाटा आहे असे प्रतिपादन कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (शेळवे) चे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी केले. दि १५ सेप्टेंबर रोजी कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये अभियंता दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
भारतरत्न पुरस्कार विजेते एम विश्वेश्वरय्या यांच्या जन्म दिनानिमित्त 15 सप्टेंबर रोजी देशात अभियंता दिवस साजरा केला जातो. हा दिवस त्यांच्यासह देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या देशातील सर्व अभियंत्यांच्या परिश्रम आणि समर्पणाला समर्पित आहे असे सांगून त्यांनी सर्वांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभियंतादिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन, ग्लास पिरॅमिड अश्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
यावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी अभियंता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दिपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कु. श्रद्धा गुरव व प्रतीक्षा शिंदे या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. रणजीत भोसले यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा