शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
हर हर महादेव चा जयघोषात भल्या पहाटे राहेर येथे गोदावरीच्या पवित्र नदीत स्नान करून खांद्यावर कावड घेऊन श्रावण पाटील भिलवंडे यांच्या पुढाकारातून राहेर ते नरसी निघालेल्या कावड यात्रेत शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला ठिक ठिकाणी या पदयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तर नरसी चौकात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली . नरसीत पहिल्यांदाच निघालेल्या या कावड यात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
अधिक मासाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते यंदा श्रावण मास आणि अधिक मास त्यातल्या त्यात काल अमावस्या असल्याने या त्रिवेणी संगम साधून नरसी येथील सिद्धेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने राहेर ते नरसी अशी भव्य कावड यात्रेचे आयोजन केले होते विशेष म्हणजे नरसीत हे कावड यात्रा प्रथमच नियोजन करण्यात आले होते. काल पहाटे चार वाजता राहेर येथे गोदावरी नदीत स्नान करून आरती करण्यात आली.यानंतर टाळ मृदंग,हरहर महादेव च्या जयघोष करीत भाविक भक्तांनी विस किलोमीटर पायी चालत कावड यात्रेत सहभागी झाले.विशेष म्हणजे भाविकांनी एकसारखी वस्त्र परिधान केल्याने हि यात्रा आकर्षक ठरली.
मुस्तापुर येथील पत्रकार हाणमंतराव चंदनकर यांनी मोठ्या भक्तिभावाने या कावड यात्रेचे स्वागत केले.शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष श्याम चोंन्डे यांनी लोहगाव फाटा येथे अल्पोपहार केळीचे वाटप केले.तर लोहगाव येथील भाजपाचे कार्यकर्ते राजेंद्र रेड्डी यांनी चहा पाण्याची सोय करून या पदयात्रेचे स्वागत केले. नरसी येथील विश्रामगृहाजवळ ही पदयात्रा पोहोचताच नरसीकरांनी जोरदार स्वागत केले येतील सामाजिक कार्यकर्ते जितू महाराज मेहता यांनी लिंबू शरबत ची सोय करून भक्तांचे स्वागत केले.
दुपारनंतर सिध्देश्वर मंदिरात महादेवाची आरती व मनोभावे पूजा करण्यात आली यानंतर महाप्रसादाने या यात्रेची सांगता झाली. यात्रा मंदिर परीसरात पोहचताच प्रतिष्ठीत व्यापारी बालाजी चिंतावार यांनी भाविकांचे स्वागत केले महादेव मंदिरात भा या कावड यात्रेचे भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, साईनाथ अक्कमवाड,माजी सरपंच व्यंकटराव कोकणे, त्र्यंबक डाके,मोहण पाटील भिलवंडे, सुभाष पेरकेवार, प्रशांत भाऊ चिंतावार, अनिल शिरमवार, विठ्ठल चिंद्रावार,बबलु बच्चेवार, साईनाथ मद्देवार, नारायण देवशेटवार, संतोष जुक्कलकर, जेष्ठ पत्रकार गंगाधर पाटील भिलवंडे, मारोती बुक्के,पवनभाऊ गादेवार, पांडुरंग नारलावार, बालाजी नारलावार, चंदकांत काचमवार,रामायणाचार्य रामकिशन महाराज राजलवाड, तुकाराम वडजे ,भीमराव बडूरे, नंदेश्वर पा कोरे, भास्कर कोकणे, भीमराव पा भवरे, बापूराव पा कोरे, राजेश्वर काप्रत्वार, त्रिंबक गागलेगावे, काशिनाथ कोकणे, बंटी कोकुलवार सह असंख्य भाविक सहभागी झाले होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा