महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या बैठकीत दिलीप दिवटे यांची निवड
नुकतीच पारनेर तालुक्याची शिवसेना महाराष्ट्र मजदूर संघटनेची बैठक झाली. त्यामध्ये वाघुंडे बुद्रुक येथील दिलीप सोपान दिवटे यांची शिवसेना महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या पारनेर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दिलीप दिवटे यांनी आगामी काळात अनेक सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये एमआयडीसीतील मजुरांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य त्यांनी नेहमी केलेले आहे. तसेच त्यांनी माहिती सेवा समिती या संघटनेमध्ये ही काम केले आहे.
त्यांच्या कामाचा लेखाजोखा पाहून त्यांना शिवसेना महाराष्ट्र मजदूर संघटनेमध्ये कार्य करण्याची संधी देण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इरफान भाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रवीण जाधव जन सेक्रेटरी यांच्याकडून त्यांना एक वर्षासाठी तालुका अध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे दिवटे यांचा त्यांच्या गावांमधून तसेच पंचक्रोशीतून त्यांच्यावरती अभिनंधनाचा वर्षाव होत आहे प्रसार माध्यमांशी बोलताना दिवटे म्हणाले इथून पुढे एमआयडीसी मधील जे कामगारांचे प्रश्न असतील ते सोडवण्यामध्ये मी कटिबद्ध राहील व नेहमी संघटना वाढीचे कार्य करील.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा