परमेश्वर पाटील कदम सरपंच प्रतिनिधी आ.राजेश पवार यांच्या पॅनलचा दणदणीत विजय
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील सोमठाणा ग्रामपंचायतची निवडणूक गेल्या अडीच वर्षाखाली पार पडल्यानंतर सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होते या पदाचे दोन उमेदवार चांगुणाबाई शंकर कदम व सौ प्रयागबाई बळीराम कदम हे निवडून आल्यानंतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी दोन्ही उमेदवारांना अडीच-अडीच वर्षासाठी सरपंच पदासाठी नेमणूक करण्याची प्रक्रिया ठरल्या प्रमाणे तत्कालीन सरपंच यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर सर्व सदस्यांनी माजी चेअरमन बळीराम पा.कदम यांच्या नेतृत्वाखाली सौ प्रयागबाई बळीराम कदम यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कदम पाटील सोमठाणकर घराण्याचे आधारस्तंभ असलेले सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी भगवानराव नागोजी पा. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एकहाती सत्ता खेचून आणून कदम पा.घराण्याने एक इतिहास निर्माण केला आहे.त्यामुळे सोमठाणा नगरीतील सर्वांचे आशिर्वाद, साथ, पाठबळ कायम पाठीशी असेच रहावे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा