पत्रकार संरक्षण कायद्याची राजव्यापी होळी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
पत्रकारावरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यात होत असलेली शासन स्तरावरील कुचराई साठी ,निषेधार्थ राज्यातील पत्रकाराच्या 11 प्रमुख संघटनांनी पत्रकार संरक्षण कायद्याची राजव्यापी होळी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम .देशमुख यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली १७ ऑगस्ट रोजी हदगाव येथे सोशल मीडिया व प्रिंट मीडिया मराठी पत्रकार संघाच्या वतीने सदर बाबीचा व पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत पत्रकार संरक्षण कायद्याची हदगाव येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे . पत्रकारावर होत असलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला .
पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकारावर हल्ले करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही झालीच पाहिजे, या घोषणांनी पत्रकारांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे ,पत्रकारावरील हल्ल्याचे खटले जलद गती न्यायालयामार्फत चालविणे, व पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे हदगाव येथे सोशल मीडिया व प्रिंट मीडिया मराठी पत्रकार संघाच्या वतीने सविस्तर लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हदगाव येथील तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले आहे . यावेळी पत्रकार चांद पाशा, प्रा.गजानन गिरी सर ,पंडित मामा पतंगे, गजानन सुकापुरे, यादव सुकापुरे, गौतम वाठोरे, गजानन जिदेवार आष्टीकर , प्रा.राजेश राऊत,धर्मराज गायकवाड, भगवान कदम, मारुती काकडे, महेंद्र धोंगडे, सोनसळे, दयानंद कदम, जुनेद शेख, सचिन मुगटकर, सुनील व्यवहारे, के. डी. पवार, संतोष वाघमारे, शेख शहबाज ,बोरकर, इत्यादी सोशल मीडिया व प्रिंट मीडिया चे पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा