पदभार स्वीकारताच धडाकेबाज कामाला सुरुवात
शिवशाही वृत्तसेवा, धर्माबाद (तालुका प्रतिनिधी नारायण सोनटक्के)
धर्माबाद तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सौ. स्वाती दाभाडे यांनी धर्माबाचा पदभार स्वीकारला असुन आमदार राजेश पवार यांच्या सोबत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीतल्या पिकाची पाहणी केली.
ज्या ज्या शेतकऱ्यांच पावसामुळे अतोनात नुकसान झालं आहे त्या नुकसान भरपाई साठी ते लवकरच प्रशासनाच्या मदतीने अनुदान मंजूर करून मावेजा मिळवून देतील असे नागरिकांत अपेक्षा दिसून येत आहे .
धर्माबाद येथील उप उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांची पंढरपूर येथे बदली झाल्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून बिलोली येथील उपविभागीय अधिकारी गिरी यांच्याकडे धर्माबाद उपविभागीय अधिकारी या पदाचा पदभार देण्यात आला होता.
परंतु गिरी हे आठवड्यातून काही मोजकेच दिवस धर्माबाद येथे येत असल्यामुळे अनेकांचे कामे खोळंबली होती विविध प्रमाणपत्रासाठी शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी सदरील कार्यालयामध्ये वारंवार चकरा मारत असल्याचे चित्र दिसत होते .
पण अखेर शासनाने धर्माबाद येथील उपविभागाला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी म्हणून स्वाती दाभाडे यांची नियुक्ती केली आहे. उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी यापूर्वी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. आणि आता स्वाती दाभाडे यांनी धर्माबाद उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा